शेळीचे दुध काढताना घ्यावयाची काळजी
१० टिप्स
१]शेळी नेहमी स्वच्छ ठेवा.तिच्या अंगावर घाण साचू देवू नका.
२]शेळीचा गोठा/तिची दुध काढण्याची जागा स्वच्छ ठेवा.
३]पायामागील केस कापून टाका.
४]दुध संकलन करण्याचे पात्र स्वच्छ असुद्या.
५]दुध काढण्यासाठी stand चा वापर करा.
६]बिजू बोकड दूर ठेवा.
७]दुध काढण्यापूर्वी व नंतर शेळीची कास कोमट पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या.
८]दुध काढून झाल्यानंतर लगेच शेळी बसू नये म्हणून तिच्यापुढे किमान १५-२० मिनिटे पुरेल इतका चारा बांधून ठेवा.
९]बकरी सहज दुध काढू देत नाही ,उड्या मारते म्हणून दुधात घाण जाणार नाही याची दक्षता घ्या.
१०]उग्र घाण वासापासून दूर दुधाचे संग्रहण करा.कारण शेळीचे दुध शीघ्र गन्धग्रही असते.
टिप्पण्या