आईपासून करडांचे वेगळे संगोपन करणे आवश्यक

शेळी                                                 व्यावसयिक शेळीपालनासाठी करडे ४-५ दिवसांची झाल्यानंतर वा चालू फिरू लागल्यानंतर शेळीपासून वेगळे वाढवणे अतिशय उपयुक्त असते.पिलांना जसजशी समज येवू लागते तसतशी ती मातेच्या कासेला दुध पिण्यासाठी झटू लागतात.यात शेळीला बरेच अपाय होतात.प्रसूतीमुळे ती आधीच थोडीफार कमजोर झालेली असते.शरीरातील पोषक द्रव्ये,कल्शीयम,प्रथिने,इत्यादींचा ह्रास झालेला असतो.तसेच शिल्लक द्रव्ये/उर्जा हि दुध बनविण्याच्या कामी खर्च होत असते.करिता उर्जा टिकवून ठेवनेसाठी शेळीला जास्तीत जास्त आराम व पोष्टिक आहाराची गरज असते.पिले सतत शेळीजवळ राहत असल्याने शेळी सतत सक्रीय राहते.दुध पिण्याच्या हव्यासाने पिले तिला स्वस्थ राहू देत नाही.ती उठताच पिले दुध पिण्यासाठी झटू लागतातव शेळी स्वतःस वाचविण्यासाठी उड्या मारू लागते.दुध शिल्लक नसल्यास ती ओरडते सुद्धा कारण तिच्या स्तनास त्रास होतो.वारंवार असे घडत राहल्याने शेळीची उर्जा नष्ट होते व शेळी दिवसेंदिवस क्षीण होत जाते.
                      असे पाहण्यात आले कि सतत वा शेळी चरून आल्यानंतर सतत शेळीजवळ राहणारे पिले लवकर चारा खायला शिकत नाही.शेळीपासून दिवसेंदिवस दुध कमीकमी होत गेल्याने त्यांना पोटभर अन्न मिळत नाही व पिल्यांच्या वाढीचा वेग खुंटत जातो.सतत होणाऱ्या उर्जेच्या अपव्ययामुळे शेळीदेखील लवकर माजावर येत नाही.पर्यायाने व्यवसायावर विपरीत परिणाम पडतो व शेळीपालन व्यवसाय तोट्यात जावू लागतो.
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबादी शेळी

संगमनेरी शेळी

शेळीच्या लेंडीखत विषयी