संगमनेरी शेळी
पांढरी शुभ्र शेळी कोणाला आवडणार नाही?अर्धबंदिस्त शेळीपालनासाठी शिफारस केलेली संगमनेरी शेळी दुध व मास दोन्ही उद्देशासाठी पाळली जाते.असे म्हटले जाते कि एका शेळीचे दुध ४ माणसांच्या एका कुटुंबाला पुरेसे होते.सहज दर दिवसाला दीड ते दोन किलो दुध त्या देतात.
शारीरिक गुण वैशिष्टे :-
शारीरिक गुण वैशिष्टे :-
- संगमनेरी शेळीत निम्मेधिक शेळ्या पांढऱ्या रंगात आढळतात.६६%शेळ्या पांढऱ्या रंगात तर १६ %शेळ्या तांबड्या रंगात व उर्वरित शेळ्या पांढरट तांबड्या रंगात दिसून येतात.
- नाक चमकदार काळे किंवा तांबड्या रंगाचे असते.
- पाय/खुर काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असते.
- शिंगे:सुमारे ८%ते १२% शेळ्या बिनशिंगी आढळतात.उर्वरित शेळ्यांना शिंगे आढळतात.शिंगाचा आकार सरळ व मागे वळलेली असतात.
- कपाळ बहिर्वक्र (roman nose)आणि सपाट दिसून येते .
- दाढी संगमनेरी शेळ्यांमध्ये तुरळक प्रमाणात दाढी दिसून येते.
- शेपटी बाकदार साधारणतः १८.२५ सेमी लांबीची (कमीजास्त ०.२५ सेमी )
- कान प्रामुख्याने लोंबकळलेले असून बहुतेकदा उभे किंवा समानांतरहि दिसून येतात.
नर जन्मतः वजन २.४०० kg (.१०%कमीजास्त),३ महिने ९..०० kg (.३०%कमीजास्त),६ महिने १६.०० kg (.९०%कमीजास्त)१ वर्ष २३.०० kg (.७० %कमीजास्त)
मादा जन्मतः वजन २.०० kg (.१०%कमीजास्त),३ महिने ८.५०० kg (.३०%कमीजास्त)६ महिने १३.५००kg (.९०% कमीजास्त),१ वर्ष २४ kg (.७०%कमीजास्त)
पैदाशीचे गुण वैशिष्टे
- वयात येण्याचे वय ८ ते ९ महिने (२४५ दिवस कमीजास्त १५ दिवस )
- प्रथम माजावर येण्याचे वय ८-९ महिने (२४८ दिवस )
- प्रथम गाभण राहण्याचे वय २८७ दिवस(९महिने २६ दिवस )
- प्रथम विन्याचे वय४३० दिवस अंदाजे
- माजाचा कालावधी ४१ तास
- दोन माजामधील अंतर २२ ते २३ दिवस
- जन्मणारया करडांची टक्केवारी १करडे ४२%,जुळी करडे ५४%,तीळे करडे.३%
- आपल्या ९० दिवसांच्या दुध उत्पादन कालावधीत सरासरी ८० लिटर दुध सहज मिळते.
टिप्पण्या