शेळी पालनासाठी महत्वाच्या काही गोष्टी
उत्तम शेळीपालक होण्यासाठी तसेच शेळीपालन व्यवसायातून जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवण्यासाठी आपण खालील गोष्टीचे अनुसरण केले तर शेळीपालन व्यवसायातून नक्कीच भरीव नफा मिळण्यास मदत होईल.
१}प्रथम शेळीचे ऐकायला शिका.तिला समजून घ्या .तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध स्थापित करा.
२}अनुभव हाच गुरु माना.अनुभवातून शिकत चला.इतरांचे अनुभव देखील ऐका.
३}खर्चात कायम बचत धोरण राबवा.उपलब्ध साधन सामग्री सर्वोत्तम माना.अति/अवाजवी खर्चाने व्यवसायातील नफा कमी कमी होत जातो.अनावश्यक खर्चापासून दूर रहा.
४}चांगल्या शेळी पालकांच्या सतत संपर्कात रहा.याकरिता सोशल मिडिया चा वापर करण्यास कधीही कसर करू नका.उदा.whatsapp,facebook,इत्यादी.
५}स्वतः कामातुर व्हा.प्रत्येक कामात जमेतोवर सहभागी व्हा.गडी माणसांवर वा अननुभवी माणसांवर कधीही पूर्णतः विसंबून राहू नका.
६}तज्ञांचा सल्ला घेवूनच कोणतेही काम करा.कारण या व्यवसायात आज घेतलेल्या निर्णयावरच उद्याचा नफा अवलंबून आहे.कोणताही निर्णय घेताना फार उशीर करू नका.
७}ठरवा म्हणजे मिळेल व शोधा म्हणजे सापडेल हे या व्यवसायाचे ब्रीद आहे ,हे स्मरणात असू द्या.
८}यशस्वी फार्म्स/शेळीपालक बघत चला .त्यातून काही नवीन सकारात्मक शिकत चला.अवलंब करत चला.प्रत्येक गोष्टी नव्याने शिकत चला.
९}कधीही अंदाजे खरेदी विक्री करू नका.नफा तोटा पाहताना प्रत मात्र घसरणार नाही याची दक्षता घ्या.
१०}सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक गोष्ट नोंद करा.उदा.जन्म,मृत्यू,लसीकरण,जंतनाशक,उपचार,खरेदी,विक्री,आवक,जावक,इत्यादी.

टिप्पण्या