शेळीचे दुध काढताना घ्यावयाची काळजी


शेळीचे दुध हे मानवासाठी एक पूर्ण आहार म्हणून फार पूर्वीपासून प्रचलित आहे .ज्यांना शेळीच्या दुधाचे गुणधर्म माहिती आहेत ते फार आवडीने शेळीचे दुध सेवन करतात.तर ज्यांना माहिती नाही असे किवा याविषयी अज्ञ लोक घरी शेळ्या असूनही शेळीच्या दुधाची हेटाळणी करतात.बरेच जण शेळीच्या दुधाचा उग्र वास येतो म्हणून ते पिण्याचे टाळतात.तर बघूया आता शेळीपासून शुद्ध स्वच्छ दुध मिळवण्याचे तंत्र...........................
१० टिप्स
१]शेळी नेहमी स्वच्छ ठेवा.तिच्या अंगावर घाण साचू देवू नका.
२]शेळीचा गोठा/तिची दुध काढण्याची जागा स्वच्छ ठेवा.
३]पायामागील केस कापून टाका.
४]दुध संकलन करण्याचे पात्र स्वच्छ असुद्या.
५]दुध काढण्यासाठी stand चा वापर करा.
६]बिजू बोकड दूर ठेवा.
७]दुध काढण्यापूर्वी व नंतर शेळीची कास कोमट पाण्याने स्वच्छ धुवून कोरड्या फडक्याने पुसून घ्या.
८]दुध काढून झाल्यानंतर लगेच शेळी बसू नये म्हणून तिच्यापुढे किमान १५-२० मिनिटे पुरेल इतका चारा बांधून ठेवा.
९]बकरी सहज दुध काढू देत नाही ,उड्या मारते म्हणून दुधात घाण जाणार नाही याची दक्षता घ्या.
१०]उग्र घाण वासापासून दूर दुधाचे संग्रहण करा.कारण शेळीचे दुध शीघ्र गन्धग्रही असते.

टिप्पण्या

Niraj Nakhate म्हणाले…
प्रथम आपल्या कार्या बद्दल अभिनंदन. आपण दिलेली माहिती सुंदर आहे.
Niraj Nakhate म्हणाले…
प्रथम आपल्या कार्या बद्दल अभिनंदन. आपण दिलेली माहिती सुंदर आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबादी शेळी

संगमनेरी शेळी

शेळीच्या लेंडीखत विषयी