पोस्ट्स

शेळीच्या गोठ्याविषयी

शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागत पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना,नदीनाल्यात कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्‍या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घातले जात नाही.किंवा बहुतेक मोठे शेळीपालक सकाळ व संध्याकाळ दोन वेळा . अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात आहेत. परंतु या पद्धतीत काही फायदे आहेत आणि काही दोषही आहेत. फायदा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्‍नच नसतो. मात्र या पद्धतीने फार प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्‍याला शेळी पालनाचा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर करून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आता पुढे आली आहे. जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्‍यामध्ये कायम कोंडून ठेवून तिथे त्यांना चारा-पाणी दे...

प्रजनन व्यवस्थापन म्हणजे शेळी पालनातून भरघोस उत्पन्नाची हमी

शेळी पालन करताना शेळी पासून मिळणारे करडे म्हणजेच उत्पन्न होय.या अनुषंगाने पाहता उत्तम करडे म्हणजे उत्तम उत्पन्न आहे.मग प्रजननाकडे दुर्लक्ष करता कामा नये.तर बघूया कसे करावे प्रजनन व्यवस्थापन .                 १} शेळीचे वय किमान ९ महिने असावे.तर वजन किमान ३० किलो असले पाहिजे .      २}पहिलटकरीण शेळीचे प्रथम दोन माज सोडून तिसऱ्या माजात रेतन करावे.किंवा शेळी भरवून घ्यावी. ३}शेळी दर २१ (१८-२१)दिवसांनी माजावर येते.माजाचा कालावधी ३० ते ३६ तासाचा असतो.असे दिसून येते कि शेळीमधील स्त्रीबीज  २४ ते ३० तासात  सुरु होत असते.म्हणून याच काळात किमान दोनदा शेळी भरवून घ्यावी.किंवा कृत्रिम रेतन करावे. ४}प्रजननासाठी साधारणतः २५ शेळ्यामागे एक नर ठेवावा.हा बोकड निट पाहून ,तपासून घ्यावा.त्याचा /त्याच्या आईचा उत्पादनक्षमतेचा इतिहास म्हणजेच शेळीपालन व्यवसायाचे भविष्य आहे. ५}माजाची तारीख ,भरविल्याची तारीख,बोकडाची नोंद,विण्याची संभावित तारीख  इत्यादी बाबी नोंद करून घ्याव्या.(गर्भवती शेळी आरोग्य कार्ड) ६}शेळी भरविल्यानंतरपुढील दो...

जाणून घेवूया शेळीपालनात प्रजननातील सामान्य चुका व उपाय .

    शेळीपालन व्यवसायात नफा तोटा हा शेळ्यांच्या प्रजननावर अवलंबून राहत असल्याने त्यांच्या प्रजननावर जाणीव पूर्वक लक्ष देणे अनिवार्य आहे.केवळ शेळी पालनात नफा आहे अशा मोघमात शेळीपालन व्यवसाय करताना हा व्यवसाय केवळ ना नफा ना तोटा या तत्वावर चालताना /चालवताना आपल्याला साधारण शेळीपालक दिसून येतो.तर थोडा बहुत अभ्यास पूर्वक पद्धतीने शेळीपालन करणारा व्यावसायिक प्रजनन या बाबीकडे चुकूनही दुर्लक्ष करताना दिसून येणार नाही. सदर लेखात फार सखोल वैचारिक विवेचन न करता आपण ठळक चुका व ठळक दुरुस्ती कशा आहेत ते पाहू.   ठळक चुका. १)आपली शेळी ज्या बोकडापासून फळणार आहे तो बोकड त्या शेळीचा अ)मुलगा ब)वडील क)नातू ड)पन्नातु ढ)पणजोबा च)चुलत भाऊ छ)मावसभाऊ ज)सख्खा भाऊ झ)काका त)मामा ठ)जवळील/रक्ताच्या नात्यातील तर नाही ना? २)ज्या बोकडापासून आपण शेळी फळवत आहे तो बोकड त्या शेळीपेक्षा अ)वय ब)वजन क)उंची ड)लांबी ढ)प्रत च)ताकद/क्षमता  इत्यादीने कमी तर नाही ना? ३) जी शेळी आपण फळवणार आहे तिची गर्भ संगोपनासाठी शारीरिक क्षमता आहे कि नाही?              असे एक ना...

संगमनेरी शेळी

                                पांढरी शुभ्र शेळी कोणाला आवडणार नाही?अर्धबंदिस्त शेळीपालनासाठी शिफारस केलेली संगमनेरी शेळी दुध व मास दोन्ही उद्देशासाठी पाळली जाते.असे म्हटले जाते कि एका शेळीचे दुध ४ माणसांच्या एका कुटुंबाला पुरेसे होते.सहज दर दिवसाला दीड ते दोन किलो दुध त्या देतात. शारीरिक गुण वैशिष्टे :- संगमनेरी शेळीत निम्मेधिक शेळ्या पांढऱ्या रंगात आढळतात.६६%शेळ्या पांढऱ्या रंगात तर १६ %शेळ्या तांबड्या रंगात व उर्वरित शेळ्या पांढरट तांबड्या रंगात दिसून येतात. नाक चमकदार काळे किंवा तांबड्या रंगाचे असते. पाय/खुर काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असते. शिंगे:सुमारे ८%ते १२% शेळ्या बिनशिंगी आढळतात.उर्वरित शेळ्यांना शिंगे आढळतात.शिंगाचा आकार सरळ व मागे वळलेली असतात. कपाळ बहिर्वक्र (roman nose)आणि सपाट दिसून येते . दाढी संगमनेरी शेळ्यांमध्ये तुरळक प्रमाणात दाढी दिसून येते. शेपटी बाकदार साधारणतः १८.२५ सेमी लांबीची (कमीजास्त ०.२५ सेमी ) कान प्रामुख्याने लोंबकळलेले असून बहुतेकदा उभे किंवा समानांतरहि दिसून य...

चला शिकूया व्यावहारिक शेळीपालन : उस्मानाबादी शेळी

चला शिकूया व्यावहारिक शेळीपालन : उस्मानाबादी शेळी

उस्मानाबादी शेळी

इमेज
उस्मानाबादी शेळी            हि  जात दुहेरी उपयोगाची म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद,लातूर,बीड,परभणी,अहमदनगर,सोलापूर  भागातील असून विदर्भात सर्वदूर या शेळ्या दिसून येतात.राज्यातील शेळ्यांच्या जातीचा विचार करता उस्मानाबादी शेळी उत्पादनाला किफायती असल्याने वेगवेगळ्या संस्था ,शासन या जातीच्या शेळ्या पाळण्याचा सल्ला दिला जातो.या शेळ्यांची वाढ अतिशय जलद असून वर्षभरातच त्या ४०-५० किलोच्या होतात.साधारण उंच जनावर असून नराचे वजन सरासरी ३३.५ kg तर मादी ३१.५ kg पर्यंत असते.साधारणतः ७५%शेळ्या रंगाने काळ्या दिसून येतात तर करड्या,पांढऱ्या,ठिपकेदार सुद्धा दिसून येतात.या शेळ्या जुळी करडांसाठी प्रसिध्द असून बहुतांश उत्तम व्यवस्थापनातील शेळ्या ३,४,५ पर्यंत पिले एक्काच वेतात देताना सुद्धा पाहण्यात आले आहे. उस्मानाबादी शेळ्यांचे शारीरिक गुणधर्म:- रंग :काळा कान :-लोंबकळनारे. शिंगे:-मागे वळलेली उंची:६५ ते ७० सेंटी मीटर लांबी:-६० ते ६५ सेंटी मीटर छाती :-६५ ते ७० सेंटी मीटर वजणे:- पिलांचे जन्मतः वजन :- करडाचे जन्मतः वजन सरासरी २.५०० kg...