प्रजनन व्यवस्थापन म्हणजे शेळी पालनातून भरघोस उत्पन्नाची हमी

शेळी पालन करताना शेळी पासून मिळणारे करडे म्हणजेच उत्पन्न होय.या अनुषंगाने पाहता उत्तम करडे म्हणजे उत्तम उत्पन्न आहे.मग प्रजननाकडे दुर्लक्ष करता कामा नये.तर बघूया कसे करावे प्रजनन व्यवस्थापन .               
१} शेळीचे वय किमान ९ महिने असावे.तर वजन किमान ३० किलो असले पाहिजे .

     २}पहिलटकरीण शेळीचे प्रथम दोन माज सोडून तिसऱ्या माजात रेतन करावे.किंवा शेळी भरवून घ्यावी.
३}शेळी दर २१ (१८-२१)दिवसांनी माजावर येते.माजाचा कालावधी ३० ते ३६ तासाचा असतो.असे दिसून येते कि शेळीमधील स्त्रीबीज  २४ ते ३० तासात  सुरु होत असते.म्हणून याच काळात किमान दोनदा शेळी भरवून घ्यावी.किंवा कृत्रिम रेतन करावे.
४}प्रजननासाठी साधारणतः २५ शेळ्यामागे एक नर ठेवावा.हा बोकड निट पाहून ,तपासून घ्यावा.त्याचा /त्याच्या आईचा उत्पादनक्षमतेचा इतिहास म्हणजेच शेळीपालन व्यवसायाचे भविष्य आहे.
५}माजाची तारीख ,भरविल्याची तारीख,बोकडाची नोंद,विण्याची संभावित तारीख  इत्यादी बाबी नोंद करून घ्याव्या.(गर्भवती शेळी आरोग्य कार्ड)
६}शेळी भरविल्यानंतरपुढील दोन माज काळजीपूर्वक शेळीची पाहणी करावी.  जर माज दिसून आला नाही तर शेळी गाभण आहे असे समजण्यास हरकत नाही.तसेच तिची तज्ञाकडून वा पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी . शेळी गाभण आहे कि नाही हे तपासण्यासाठी गावठी वा चुकीच्या पद्धतीचा अवलंब करू नये.उदा.स्तनातून दुध ओढणे,नाक-तोंड दाबणे,इत्यादी.
७]शेळी गाभण असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांचे व्यवस्थापन वेगळे करावे.त्यांना संतुलित/पूरक/ आहार/अलप/दाणा मिश्रण ,हिरवा व वाळलेला चारा ,स्वच्छ पिण्याचे पाणी वेळेवर पुरवावे.तसे वेळापत्रक तयार करावे.
८}दर आठवड्यास वजन नोंद ,दररोजचा आहार नोंद ,उपचार नोंद ,टीप/टिपणी/शेरा इत्यादी नोंदी ना विसरता वेळेवर घेत गेल्यास बरेच धोके टाळता येतात.तथापि पुढील नियोजन/नफा तोटा मोजमाप/ करण्यास ते आवश्यक असते.
९}गाभण शेळ्यांना वेळोवेळी जंतनाशक ,लसीकरण,औषधी उपचार पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जरूर करावे.
१०}प्रसुतीच्या  तारखेच्या किमान एक महिना अगोदर पासून चरण्यासाठी फार लांब सोडू नये.कळपात शेळ्यांची भांडणे होऊ देवू नये.गाभण शेळीस काळजीपूर्वक हाताळावे.

                                   गाभण शेळीची व्यवस्थित देखभाल केल्यास निच्छितच शेळी सुदृढ करडे देईल.पोषण व वजनवाढीवर लक्ष केंद्रित करून  गाभण शेळीचे  अभ्यासपूर्वक संगोपन करावे. उत्पन्न व उत्पादकता या दोन्ही बाबींवर नियंत्रण मिळवल्यास शेळीपालन व्यवसायातून भरघोस नफा खात्रीशीरपणे नियमित मिळत राहतो.
संदर्भ /स्त्रोत :इंटरनेट 

                

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबादी शेळी

संगमनेरी शेळी

शेळीच्या लेंडीखत विषयी