जाणून घेवूया शेळीपालनात प्रजननातील सामान्य चुका व उपाय .
शेळीपालन व्यवसायात नफा तोटा हा शेळ्यांच्या प्रजननावर अवलंबून राहत असल्याने त्यांच्या प्रजननावर जाणीव पूर्वक लक्ष देणे अनिवार्य आहे.केवळ शेळी पालनात नफा आहे अशा मोघमात शेळीपालन व्यवसाय करताना हा व्यवसाय केवळ ना नफा ना तोटा या तत्वावर चालताना /चालवताना आपल्याला साधारण शेळीपालक दिसून येतो.तर थोडा बहुत अभ्यास पूर्वक पद्धतीने शेळीपालन करणारा व्यावसायिक प्रजनन या बाबीकडे चुकूनही दुर्लक्ष करताना दिसून येणार नाही. सदर लेखात फार सखोल वैचारिक विवेचन न करता आपण ठळक चुका व ठळक दुरुस्ती कशा आहेत ते पाहू.
ठळक चुका.
१)आपली शेळी ज्या बोकडापासून फळणार आहे तो बोकड त्या शेळीचा अ)मुलगा ब)वडील क)नातू ड)पन्नातु ढ)पणजोबा च)चुलत भाऊ छ)मावसभाऊ ज)सख्खा भाऊ झ)काका त)मामा ठ)जवळील/रक्ताच्या नात्यातील तर नाही ना?
२)ज्या बोकडापासून आपण शेळी फळवत आहे तो बोकड त्या शेळीपेक्षा अ)वय ब)वजन क)उंची ड)लांबी ढ)प्रत च)ताकद/क्षमता इत्यादीने कमी तर नाही ना?
३) जी शेळी आपण फळवणार आहे तिची गर्भ संगोपनासाठी शारीरिक क्षमता आहे कि नाही?
असे एक ना अनेक प्रश्न चुकीच्या प्रकारात मोडणारे असून या मुळे शेळीपालन व्यवसायात थेट तोटा आल्याशिवाय राहत नाही.
अगदी छोट्या छोट्या चुका आपbakarideals.simdif.com ण सुधाराविल्या जसे शेळीच्या जवळच्या नात्यात(अन्तःप्रजनन) संकर घडू नये,ज्या बोकडापासून शेळी फळणार आहे तो बोकड सर्व बाबीत जवळपास दीड पट असावा.
या अनुषंगाने आपण खालीलप्रमाणे दुरुस्ती करू शकतो.
--प्रजननासाठी वापरत असलेला बोकड कळपातील नसावा.म्हणजेच तो जवळच्या/रक्ताच्या/प्रतिबंधित नात्यातील नसावा.
--साधारण दीड वर्षानंतरच बोकड प्रजननासाठी वापरावा.
--प्रजनक बोकडाची वंशावळ सुदृढ,उत्पादनक्षम, कमीत कमी दोन किंवा त्याहून अधिक पिले देणारी असावी.
--वजन वाढीचा दर उत्तम असावा.
--त्याचे दोन्ही अंडाशय/वृषण समान असावे.
--असा बोकड दीड ते दोन वर्षापेक्षा जास्त कळपात ठेवू नये.तो अदलाबदल करावा.अन्यथा परत अन्तःप्रजननाचा धोका कायम राहतो.
--साधारण ९ महिने वयापर्यंत पाठीचे व दीड वर्षापर्यंत बोकडाचे वेगळे संगोपन करावे.म्हणजे नको असलेले प्रजनन टाळता येते.
--प्रजनक बोकादास त्याची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी आगावू अलप देणे गरजेचे आहे साधारणतः १५० ग्राम अलप कटाक्षाने रोज द्यावी.शेळ्यांच्या माज येण्याच्या काळात अलप दीडपट करावी.
-- साधारणतः १०-२० शेळ्या मागे एक नर ठेवावा.
अशा प्रकारे प्रजननावर नियंत्रण मिळवल्यास शेळीपालन व्यवसाय निच्छितच फायदेशीर होणार यात शंका नाही.
टिप्पण्या