पोस्ट्स

बीटल शेळी

इमेज
                              बीटल शेळी या शेळीचे नाव बीटल शेळी ही शेळी मांस आणि दुधासाठी फार उपयुक्त आहे. ज मनापारीसारख्या दिसणाऱ्या  बीटल जातीच्या शेळ्या पंजाबमध्ये आढळतात. नरांना बहुधा दाढी असते. या जातीच्या शेळ्यांच्या पांढऱ्या रंगावर तांबड्या किंवा तांबूस रंगाचे मोठे ठिपके असतात. शारीरिक संरचना या शेळ्यांचा आकार हा फार वेगळा असतो. याच्या आकाराने या शेळ्या सहज ओळखता येतात. या शेळ्याचे पाय लांब असतात,  कान खाली लांबलेले असतात. शेळ्याची शेपटी लहान असते, त्यांचे शिंग हे वळालेले असतात.   या शेळ्या साधारण ८६ सेंमी पर्यंत लांब असतात.  दूध क्षमता आता चर्चा करू याच्या दूध देण्याच्या क्षमतेविषयी.  या शेळ्या दूध देण्यात सरस असून याची दूध देण्याची क्षमता ही साधारण २ ते  अडीच लीटर दूध देत असतात. त्याच्या वेतात या शेळ्या १५० ते १९० लिटर दूध देऊ शकतात. या जातीच्या नर म्हणजे बोकड्याचे वजन साधरण ५० ते ६० किलो असते. तर शेळीचे वजन हे ३५ ते ४० किलो असते. बीटर शेळ्यांचा आहार  - या जातीच्या...

स्तन दाह,

स्तन दाह म्हटले की शेळीपालकाच्या कपाळावर आठी पडणारच. कारण ह्या आजाराला उत्कृष्ठ शेळ्या हमखास बळी पडतात।भरपूर दूध व सशक्त पिले देणारी शेळी सहज स्तनदाहग्रस्त होते।काही शेळीपालन बांधव ह्या आजाराबद्दल  अंधश्रद्धा बाळगून असल्याचेही माझ्या अभ्यासात दिसून आले।खरे तर अज्ञान व अस्वच्छतेमुळे शेळी स्तन दाहास बळी पडते। ज्या प्रमाणे दूध मानवासाठी,इतर पशूंसाठी पूर्ण आहार आहे तसाच तो शेळीस बाधक असनाऱ्या जंतांसाठी।(विषाणू).कासेच्या अस्वच्छते मूळे शेळीच्या दुग्धकाळात कधीही ह्या आजाराचा उद्रेक होऊ शकतो।असे होऊ नये म्हणून आपणास दूध देणाऱ्या किंवा पिले पाजणाऱ्या  शेळीचे यथोचित व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। 1।पिले सतत शेळी जवळ न ठेवता ठराविक अंतराने त्यांना दूध पाजावे। 2।पिले दूध पिण्यापूर्वी आणि नंतर,तसेच आपण दूध काढण्यापूर्वी आणि नंतर शेळीचे स्तन स्वच्छ पाण्याने धुवून पुसून टाकावे। 3।शेळी स्वच्छ जागी असावी। उपाय। अलोपॅथीमध्ये पेंडीस्ट्रेन नावाने बाजारात ऑइनमेंट उपलब्ध आहेत। 2।होमिओपॅथी मध्ये स्तनदाहशमनी नावाने गोळ्या मिळतात।5 गोळ्या सकाळ-दुपार-सायंकाळ दिल्याने आराम पडतो। 3।आयुर्वेदिक/घरघु...

शेळीच्या गोठ्याविषयी

शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागत पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना,नदीनाल्यात कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्‍या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घातले जात नाही.किंवा बहुतेक मोठे शेळीपालक सकाळ व संध्याकाळ दोन वेळा . अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात आहेत. परंतु या पद्धतीत काही फायदे आहेत आणि काही दोषही आहेत. फायदा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्‍नच नसतो. मात्र या पद्धतीने फार प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्‍याला शेळी पालनाचा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर करून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आता पुढे आली आहे. जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्‍यामध्ये कायम कोंडून ठेवून तिथे त्यांना चारा-पाणी दे...

प्रजनन व्यवस्थापन म्हणजे शेळी पालनातून भरघोस उत्पन्नाची हमी

शेळी पालन करताना शेळी पासून मिळणारे करडे म्हणजेच उत्पन्न होय.या अनुषंगाने पाहता उत्तम करडे म्हणजे उत्तम उत्पन्न आहे.मग प्रजननाकडे दुर्लक्ष करता कामा नये.तर बघूया कसे करावे प्रजनन व्यवस्थापन .                 १} शेळीचे वय किमान ९ महिने असावे.तर वजन किमान ३० किलो असले पाहिजे .      २}पहिलटकरीण शेळीचे प्रथम दोन माज सोडून तिसऱ्या माजात रेतन करावे.किंवा शेळी भरवून घ्यावी. ३}शेळी दर २१ (१८-२१)दिवसांनी माजावर येते.माजाचा कालावधी ३० ते ३६ तासाचा असतो.असे दिसून येते कि शेळीमधील स्त्रीबीज  २४ ते ३० तासात  सुरु होत असते.म्हणून याच काळात किमान दोनदा शेळी भरवून घ्यावी.किंवा कृत्रिम रेतन करावे. ४}प्रजननासाठी साधारणतः २५ शेळ्यामागे एक नर ठेवावा.हा बोकड निट पाहून ,तपासून घ्यावा.त्याचा /त्याच्या आईचा उत्पादनक्षमतेचा इतिहास म्हणजेच शेळीपालन व्यवसायाचे भविष्य आहे. ५}माजाची तारीख ,भरविल्याची तारीख,बोकडाची नोंद,विण्याची संभावित तारीख  इत्यादी बाबी नोंद करून घ्याव्या.(गर्भवती शेळी आरोग्य कार्ड) ६}शेळी भरविल्यानंतरपुढील दो...

जाणून घेवूया शेळीपालनात प्रजननातील सामान्य चुका व उपाय .

    शेळीपालन व्यवसायात नफा तोटा हा शेळ्यांच्या प्रजननावर अवलंबून राहत असल्याने त्यांच्या प्रजननावर जाणीव पूर्वक लक्ष देणे अनिवार्य आहे.केवळ शेळी पालनात नफा आहे अशा मोघमात शेळीपालन व्यवसाय करताना हा व्यवसाय केवळ ना नफा ना तोटा या तत्वावर चालताना /चालवताना आपल्याला साधारण शेळीपालक दिसून येतो.तर थोडा बहुत अभ्यास पूर्वक पद्धतीने शेळीपालन करणारा व्यावसायिक प्रजनन या बाबीकडे चुकूनही दुर्लक्ष करताना दिसून येणार नाही. सदर लेखात फार सखोल वैचारिक विवेचन न करता आपण ठळक चुका व ठळक दुरुस्ती कशा आहेत ते पाहू.   ठळक चुका. १)आपली शेळी ज्या बोकडापासून फळणार आहे तो बोकड त्या शेळीचा अ)मुलगा ब)वडील क)नातू ड)पन्नातु ढ)पणजोबा च)चुलत भाऊ छ)मावसभाऊ ज)सख्खा भाऊ झ)काका त)मामा ठ)जवळील/रक्ताच्या नात्यातील तर नाही ना? २)ज्या बोकडापासून आपण शेळी फळवत आहे तो बोकड त्या शेळीपेक्षा अ)वय ब)वजन क)उंची ड)लांबी ढ)प्रत च)ताकद/क्षमता  इत्यादीने कमी तर नाही ना? ३) जी शेळी आपण फळवणार आहे तिची गर्भ संगोपनासाठी शारीरिक क्षमता आहे कि नाही?              असे एक ना...

संगमनेरी शेळी

                                पांढरी शुभ्र शेळी कोणाला आवडणार नाही?अर्धबंदिस्त शेळीपालनासाठी शिफारस केलेली संगमनेरी शेळी दुध व मास दोन्ही उद्देशासाठी पाळली जाते.असे म्हटले जाते कि एका शेळीचे दुध ४ माणसांच्या एका कुटुंबाला पुरेसे होते.सहज दर दिवसाला दीड ते दोन किलो दुध त्या देतात. शारीरिक गुण वैशिष्टे :- संगमनेरी शेळीत निम्मेधिक शेळ्या पांढऱ्या रंगात आढळतात.६६%शेळ्या पांढऱ्या रंगात तर १६ %शेळ्या तांबड्या रंगात व उर्वरित शेळ्या पांढरट तांबड्या रंगात दिसून येतात. नाक चमकदार काळे किंवा तांबड्या रंगाचे असते. पाय/खुर काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असते. शिंगे:सुमारे ८%ते १२% शेळ्या बिनशिंगी आढळतात.उर्वरित शेळ्यांना शिंगे आढळतात.शिंगाचा आकार सरळ व मागे वळलेली असतात. कपाळ बहिर्वक्र (roman nose)आणि सपाट दिसून येते . दाढी संगमनेरी शेळ्यांमध्ये तुरळक प्रमाणात दाढी दिसून येते. शेपटी बाकदार साधारणतः १८.२५ सेमी लांबीची (कमीजास्त ०.२५ सेमी ) कान प्रामुख्याने लोंबकळलेले असून बहुतेकदा उभे किंवा समानांतरहि दिसून य...

चला शिकूया व्यावहारिक शेळीपालन : उस्मानाबादी शेळी

चला शिकूया व्यावहारिक शेळीपालन : उस्मानाबादी शेळी