स्तन दाह,

स्तन दाह म्हटले की शेळीपालकाच्या कपाळावर आठी पडणारच. कारण ह्या आजाराला उत्कृष्ठ शेळ्या हमखास बळी पडतात।भरपूर दूध व सशक्त पिले देणारी शेळी सहज स्तनदाहग्रस्त होते।काही शेळीपालन बांधव ह्या आजाराबद्दल  अंधश्रद्धा बाळगून असल्याचेही माझ्या अभ्यासात दिसून आले।खरे तर अज्ञान व अस्वच्छतेमुळे शेळी स्तन दाहास बळी पडते।
ज्या प्रमाणे दूध मानवासाठी,इतर पशूंसाठी पूर्ण आहार आहे तसाच तो शेळीस बाधक असनाऱ्या जंतांसाठी।(विषाणू).कासेच्या अस्वच्छते मूळे शेळीच्या दुग्धकाळात कधीही ह्या आजाराचा उद्रेक होऊ शकतो।असे होऊ नये म्हणून आपणास दूध देणाऱ्या किंवा पिले पाजणाऱ्या  शेळीचे यथोचित व्यवस्थापन करणे गरजेचे आहे।
1।पिले सतत शेळी जवळ न ठेवता ठराविक अंतराने त्यांना दूध पाजावे।
2।पिले दूध पिण्यापूर्वी आणि नंतर,तसेच आपण दूध काढण्यापूर्वी आणि नंतर शेळीचे स्तन स्वच्छ पाण्याने धुवून पुसून टाकावे।
3।शेळी स्वच्छ जागी असावी।
उपाय।
अलोपॅथीमध्ये पेंडीस्ट्रेन नावाने बाजारात ऑइनमेंट उपलब्ध आहेत।
2।होमिओपॅथी मध्ये स्तनदाहशमनी नावाने गोळ्या मिळतात।5 गोळ्या सकाळ-दुपार-सायंकाळ दिल्याने आराम पडतो।
3।आयुर्वेदिक/घरघुती उपचार
कोरफड2-3 पाने,हळद-50 ग्राम,खाण्याचा चुना 10 ग्राम
   वरील सर्व साहित्य एकत्रित कुटून एकजीव पेस्ट तयार करावी।शेळीच्या दुखऱ्या कासेवर दिवसातून 3 वेळा लावावी।3 ते 7 दिवस हा प्रयोग करावा।पेस्ट लावण्यापूर्वी कास कोमट पाण्याने स्वच्छ धुवावी।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबादी शेळी

संगमनेरी शेळी

शेळीच्या लेंडीखत विषयी