शेळ्यांच्या विविध जाती.

                    व्यावहारिक शेळीपालन व्यवसाय करताना किफायतशीर उत्पन्न मिळवून देणाऱ्या शेळ्या पाळल्याशिवाय पर्याय नाही."शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी " या म्हणी नुसार शेळीपालन व्यवसायातून रसाळ गोमटी फळे पाहिजे असल्यास शुद्ध बिजाशिवाय पर्याय नाही.बहुतांश व्यावसियाकांना आपली शेळी कुठल्या जातीची हे देखील माहिती नसते.गावराणी म्हणूनच कुठल्याही शेळीकडे बघितल्या जाते.पण काही बारकावे जाणून घेतल्यास शेळीची जात ओळखल्या जावू शकते.अशाच शुद्ध जातीचे लक्षण दाखविणाऱ्या शेळ्यांपासून मिळालेल्या उत्पन्नाचा अंदाज घेता इतरांपेक्षा जास्त मिळत असल्याचे सहज पाहण्यात येते. आज आपण पाहूया शेळ्यांच्या विविध जाती.
१)कोकण कन्याळ शेळी.  
                या शेळया कोकणातील  समुद्र किनारच्या  प्रदेशातील सिंधुदुर्ग जिल्ह्तीयातील सावंतवाडी,दोडामार्ग ,कुडाळ भागातील   असून विदर्भातही काही  प्रमाणात या शेळ्या दिसून येतात.प्रामुख्याने मासासाठी उपयुक्त जात असून,दर दोन वर्षात तीनदा करडांना जन्म देते.प्रथम माजावर येण्याचे वय ११ महिने असून वयाच्या १७व्या महिन्यात पहिल्यांदा विते.तर दोन वेतांमधील अंतर ८ महिने आहे.आपल्या सरासरी दुध उत्पादन काळात म्हणजे ९७ दिवसात ६० लिटर दुध देते तर भाकड काळ ८४ दिवसाचा असतो.उत्तम व्यवस्थापनात  एका वर्षात नराचे वजन २५ किलो तर मादीचे वजन २१ किलो पर्यंत भरू शकते.  एक ते दीड वर्षाच्या बोकडाचा मटन उतारा ५३ टक्क्याएवढा असतो.  पूर्ण वाढ झालेला बोकड ५० किलो पर्यंत तर मादी ३२ किलो पर्यंत असते.






कोकण कन्या जातीचा बिजू बोकड

कोकण कन्या जातीची शेळी `


                   कोकणाचे भूषण असणाऱ्या कोकण कन्या शेळीचे शारीरिक विशिष्ट,गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत.
१)रंग;वरच्या जबड्यावर पांढऱ्या/तांबूस रंगाचे पट्टे
२)पाय लांब पायावर काळा-पांढरा रंग असतो,पाय लांब व मजबूत असल्याने या शेळ्या डोंगराळ भागात सहज जुळवून घेतात.
३)कपाळ चपटे व रुंद असते.कान काळ्या रंगाचे असून त्यांच्या कडा पांढऱ्या/तांबूस रंगाच्या दिसून येतात.
४)शिंगे टोकदार, सरळ,मागे वळली असतात.
५) नाक स्वच्छ,रुंद असते.
६)कातडी मुलायम ,गुळगुळीत असते.
७)ह्या शेळ्या नियमित आणि वर्षभर माजावर येतात ,जुळ्यांचे प्रमाण ६६%पर्यंत असून उन्हाळ्यात विणाऱ्या शेळ्यांमध्ये जुळी करडे अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून येते.
८)ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे  पाठ काळी व पोटाखाली पांढरा किंवा तांबूस रंग त्याच रंगाच्या कानावर,डोळ्यावर पायावर कडा.
                               याशिवाय चित्रात पाहून आपणास कोकण कन्या शेळी ओळखणे कठीण जाणार नाही.कोकण कन्या जातीचा कळप अतिशय सुंदर दिसून येतो.
    सरासरी जन्म वजन १.७६०किलो ते २.१९ किलो दिसून येते.तर उत्तम व्यवस्थापनात ते ३ किलोपर्यंत सहज मिळवता येते.
बंदिस्त शेळीपालन करण्यास तसेच मुक्त संचार शेळीपालन करण्यास विविध हवामान/भौगोलिक परिस्थितीत जुळवून घेण्याची उत्कृष्ट क्षमता या शेळीत आहे.



{सर्व माहिती इंटरनेट वरील  विविध ठिकाणांवरून संकलित केलेली असल्याने १००%खात्रीशीर असेलच असे नाही.} 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उस्मानाबादी शेळी

संगमनेरी शेळी

शेळीच्या लेंडीखत विषयी