संगमनेरी शेळी
पांढरी शुभ्र शेळी कोणाला आवडणार नाही?अर्धबंदिस्त शेळीपालनासाठी शिफारस केलेली संगमनेरी शेळी दुध व मास दोन्ही उद्देशासाठी पाळली जाते.असे म्हटले जाते कि एका शेळीचे दुध ४ माणसांच्या एका कुटुंबाला पुरेसे होते.सहज दर दिवसाला दीड ते दोन किलो दुध त्या देतात. शारीरिक गुण वैशिष्टे :- संगमनेरी शेळीत निम्मेधिक शेळ्या पांढऱ्या रंगात आढळतात.६६%शेळ्या पांढऱ्या रंगात तर १६ %शेळ्या तांबड्या रंगात व उर्वरित शेळ्या पांढरट तांबड्या रंगात दिसून येतात. नाक चमकदार काळे किंवा तांबड्या रंगाचे असते. पाय/खुर काळ्या किंवा तांबड्या रंगाचे असते. शिंगे:सुमारे ८%ते १२% शेळ्या बिनशिंगी आढळतात.उर्वरित शेळ्यांना शिंगे आढळतात.शिंगाचा आकार सरळ व मागे वळलेली असतात. कपाळ बहिर्वक्र (roman nose)आणि सपाट दिसून येते . दाढी संगमनेरी शेळ्यांमध्ये तुरळक प्रमाणात दाढी दिसून येते. शेपटी बाकदार साधारणतः १८.२५ सेमी लांबीची (कमीजास्त ०.२५ सेमी ) कान प्रामुख्याने लोंबकळलेले असून बहुतेकदा उभे किंवा समानांतरहि दिसून य...