शेळीच्या लेंडीखत विषयी
v शेळीच्या लेन्डीखत विषयी v शेती करताना शेतीसाठी खताचे महत्व अनन्य साधारण आहे.उत्तम पिक मिळवण्यासाठी उत्तम बियाण्याइतकेच महत्व उत्तम खतदेखील तितकेच महत्वाचे आहे .खतावरच झाडाला मिळणारे पोषण अवलंबून असते.प्रामुख्याने खताचे दोन प्रकारात विभागणी केल्यास रासायनिक व सेंद्रिय असे प्रकार दिसून येतात.रासायनिक खताचा जास्तीत जास्त वापर अलीकडील काळात झाला आहे.अर्थातच हरित क्रांती नंतरच्या काळात.परंतु ह्याच्या अंधाधुंद वापरामुळे जमिनीवर,पिकावर,उत्पन्नावर विपरीत परिणाम दिसून येत असल्याने शेतकऱ्यांच्या व शास्त्रज्ञांचा कल सेंद्रिय खताकडे झालेला दिसून येत आहे.सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपीकता वाढून उत्पन्न वाढवणे सहज शक्य होत असून त्याचे जमिनीवर,पिकावर कसलेच दुष्परिणाम दिसून येत नाही. सेंद्रिय खत म्हटले कि दोन प्रकार ठळकपणे दृष्टीक्षेपात येतात .एक तर गायीम्हशींचे शेणखत व दुसरे म्हणजे शेळ्या मेंढ्याचे लेंडीखत .सध्यस्थितीत शेतकरी शेणखत अधिक प्रचलित आहे.याचे कारण म्हणजे सहज उपलब्धता व त्याच्या अधिकात अधिक प्रचार/प्रसार .तसेच त...