पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रजनन व्यवस्थापन म्हणजे शेळी पालनातून भरघोस उत्पन्नाची हमी

शेळी पालन करताना शेळी पासून मिळणारे करडे म्हणजेच उत्पन्न होय.या अनुषंगाने पाहता उत्तम करडे म्हणजे उत्तम उत्पन्न आहे.मग प्रजननाकडे दुर्लक्ष करता कामा नये.तर बघूया कसे करावे प्रजनन व्यवस्थापन .                 १} शेळीचे वय किमान ९ महिने असावे.तर वजन किमान ३० किलो असले पाहिजे .      २}पहिलटकरीण शेळीचे प्रथम दोन माज सोडून तिसऱ्या माजात रेतन करावे.किंवा शेळी भरवून घ्यावी. ३}शेळी दर २१ (१८-२१)दिवसांनी माजावर येते.माजाचा कालावधी ३० ते ३६ तासाचा असतो.असे दिसून येते कि शेळीमधील स्त्रीबीज  २४ ते ३० तासात  सुरु होत असते.म्हणून याच काळात किमान दोनदा शेळी भरवून घ्यावी.किंवा कृत्रिम रेतन करावे. ४}प्रजननासाठी साधारणतः २५ शेळ्यामागे एक नर ठेवावा.हा बोकड निट पाहून ,तपासून घ्यावा.त्याचा /त्याच्या आईचा उत्पादनक्षमतेचा इतिहास म्हणजेच शेळीपालन व्यवसायाचे भविष्य आहे. ५}माजाची तारीख ,भरविल्याची तारीख,बोकडाची नोंद,विण्याची संभावित तारीख  इत्यादी बाबी नोंद करून घ्याव्या.(गर्भवती शेळी आरोग्य कार्ड) ६}शेळी भरविल्यानंतरपुढील दो...

जाणून घेवूया शेळीपालनात प्रजननातील सामान्य चुका व उपाय .

    शेळीपालन व्यवसायात नफा तोटा हा शेळ्यांच्या प्रजननावर अवलंबून राहत असल्याने त्यांच्या प्रजननावर जाणीव पूर्वक लक्ष देणे अनिवार्य आहे.केवळ शेळी पालनात नफा आहे अशा मोघमात शेळीपालन व्यवसाय करताना हा व्यवसाय केवळ ना नफा ना तोटा या तत्वावर चालताना /चालवताना आपल्याला साधारण शेळीपालक दिसून येतो.तर थोडा बहुत अभ्यास पूर्वक पद्धतीने शेळीपालन करणारा व्यावसायिक प्रजनन या बाबीकडे चुकूनही दुर्लक्ष करताना दिसून येणार नाही. सदर लेखात फार सखोल वैचारिक विवेचन न करता आपण ठळक चुका व ठळक दुरुस्ती कशा आहेत ते पाहू.   ठळक चुका. १)आपली शेळी ज्या बोकडापासून फळणार आहे तो बोकड त्या शेळीचा अ)मुलगा ब)वडील क)नातू ड)पन्नातु ढ)पणजोबा च)चुलत भाऊ छ)मावसभाऊ ज)सख्खा भाऊ झ)काका त)मामा ठ)जवळील/रक्ताच्या नात्यातील तर नाही ना? २)ज्या बोकडापासून आपण शेळी फळवत आहे तो बोकड त्या शेळीपेक्षा अ)वय ब)वजन क)उंची ड)लांबी ढ)प्रत च)ताकद/क्षमता  इत्यादीने कमी तर नाही ना? ३) जी शेळी आपण फळवणार आहे तिची गर्भ संगोपनासाठी शारीरिक क्षमता आहे कि नाही?              असे एक ना...