बीटल शेळी
बीटल शेळी या शेळीचे नाव बीटल शेळी ही शेळी मांस आणि दुधासाठी फार उपयुक्त आहे. ज मनापारीसारख्या दिसणाऱ्या बीटल जातीच्या शेळ्या पंजाबमध्ये आढळतात. नरांना बहुधा दाढी असते. या जातीच्या शेळ्यांच्या पांढऱ्या रंगावर तांबड्या किंवा तांबूस रंगाचे मोठे ठिपके असतात. शारीरिक संरचना या शेळ्यांचा आकार हा फार वेगळा असतो. याच्या आकाराने या शेळ्या सहज ओळखता येतात. या शेळ्याचे पाय लांब असतात, कान खाली लांबलेले असतात. शेळ्याची शेपटी लहान असते, त्यांचे शिंग हे वळालेले असतात. या शेळ्या साधारण ८६ सेंमी पर्यंत लांब असतात. दूध क्षमता आता चर्चा करू याच्या दूध देण्याच्या क्षमतेविषयी. या शेळ्या दूध देण्यात सरस असून याची दूध देण्याची क्षमता ही साधारण २ ते अडीच लीटर दूध देत असतात. त्याच्या वेतात या शेळ्या १५० ते १९० लिटर दूध देऊ शकतात. या जातीच्या नर म्हणजे बोकड्याचे वजन साधरण ५० ते ६० किलो असते. तर शेळीचे वजन हे ३५ ते ४० किलो असते. बीटर शेळ्यांचा आहार - या जातीच्या...